कारखेलमधील विवाहितेवर बलात्कार, एकाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

कारखेलमधील विवाहितेवर बलात्कार, एकाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता. बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कारखेलमधीलच पिडीतेने याबाबत फिर्याद दिली. दि. ९ डिसेंबर २०२१ ते २८ आॅगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. ९ डिसेंबर रोजी ही महिला कारखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड प्रतिबंधक लस घेवून पायी घरी निघाली होती. यावेळी भापकर हा मोटारसायकलने तेथे आला. त्याने ‘वहिनी मी तुम्हाला घरी सोडतो’ असे म्हणत तिला दुचाकीवर बसवले. स्वतःचे घरी नेत तुम्ही मला खूप आवडता, असे म्हणत घरात तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले.

‘तू ओरडलीस तर खल्लास करीन’ अशी धमकी दिली. त्याने यावेळी दोघांचे फोटो काढले. हे फोटो सगळीकडे व्हायरल करेन अशी धमकी देण्यास त्याने सुरुवात केली. तुझ्या नवऱ्याला व मुलांना खल्लास करून टाकीन असे म्हणत तिला मोरगाव, खामगळवाडी आदी ठिकाणी लाॅजवर नेत तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.

Back to top button