जुन्नरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस; पाणी टंचाईचा प्रश्न निकाली | पुढारी

जुन्नरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस; पाणी टंचाईचा प्रश्न निकाली

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 750 मिलिमीटरपेक्षा अधिक म्हणजेच 1 हजार 309 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या 4 महिन्यांत एकूण 11 हजार 782 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. परिणामी, पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे.

तालुक्यामधील 9 पर्जन्यमापक केंद्रांवर या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत नोंद झालेला पाऊस, तर मागील वर्षी याच कालावधीत नोंद झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : जुन्नर : 1169/520, नारायणगाव 836/332, ओतूर 665/363, वडगाव आनंद 645/ 274, बेल्हे 923/516, निमगाव सावा 902/410, मढ 1499/1153, आपटाळे 1652/1172 आणि आजनावळे 3497/2670. जुन्नर तालुक्याची पावसाची सरासरी 750 मिलिमीटर आहे. या वर्षी या सरासरीपेक्षा जास्त 559 मिलिमीटर पाऊस अधिक झाल्याने 1 हजार 309 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे.

Back to top button