गिरवली येथील अपघातप्रकरणी बसचालकावर गुन्हा; घोडेगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

गिरवली येथील अपघातप्रकरणी बसचालकावर गुन्हा; घोडेगाव पोलिसांची कारवाई

मंचर; पुढारी वृत्तसेवा: गिरवली (ता. आंबेगाव) येथे दरीत बस कोसळून जखमी झालेले विद्यार्थी, शिक्षक यांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक लीलाधर ज्ञानेश्वर लांडगे (वय 45, रा. काळेवाडी घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) पिंपळगाव घोडे येथील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी असे मिळून 49 जण अभ्यास सहलीसाठी आयुका केंद्र गिरवली येथे गेले होते.

आयुका केंद्र येथून परतत असताना बसचालक लीलाधर ज्ञानेश्वर लांडगे यांचे बस (एमएच 14 सीडब्लू 3553) वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला 100 फूट खोल दरीत पडून अपघात झाला होता. या अपघातात स्वतः चालक लीलाधर ज्ञानेश्वर लांडगे, मनीष साखरचंद बिनायक्या, मुख्याध्यापक सुरेश मुळे यांच्या हाता-पायाला, छातीला मुका मार लागला होता. तसेच, इतर 38 विद्यार्थी जखमी झाले होते.

दरम्यान, निष्काळजीपणे वाहन
चालवून विद्यार्थी व शिक्षकांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मनीष साखरचंद बिनायक्या (वय 53, रा. नक्षत्र सोसायटी जुना आळंदी रोड मोशी, ता. हवेली) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात बसचालकाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बसचालक
लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डोले करीत आहेत.

Back to top button