डुंबरवाडीला स्थानिक वाहनांनाही आजपासून टोल | पुढारी

डुंबरवाडीला स्थानिक वाहनांनाही आजपासून टोल

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सवलत देण्यात येत होती. मात्र, दि. 25 सप्टेंबरपासून सर्व प्रकारच्या वाहनांना मासिक पास घ्यावा लागणार असून, पासद्वारे टोल भरावा लागेल, अशी माहिती डुंबरवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापक जयप्रकाश अग्रवाल यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे. मोटारींना सुमारे 315 रुपये महिना पाससाठी मोजावा लागणार असून, इतर सर्व प्रकारच्या वाहनांना वेगवेगळा दर आकारण्यात आलेला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक नागरिकांचे आधारकार्ड डुप्लिकेट बनवून इतर जिल्ह्यांतील अनेक वाहनचालक टोल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आल्यामुळे टोल प्रशासनाला हा नव्याने नियम करावा लागत असल्याचे व्यवस्थापकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले आहे. सर्व वाहन चालक व मालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन टोल प्रशासनाने केले आहे.

Back to top button