पुणे : व्हॉलिबॉल खेळ तळागाळात पोहोचवू: आमदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : व्हॉलिबॉल खेळ तळागाळात पोहोचवू: आमदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशनच्या माध्यमातून राज्यात व्हॉलिबॉल खेळाची तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या खेळाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्रात भरविल्या जातील,’ असे आश्वासन असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार नीलेश लंके यांनी दिले.

असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. असोसिएशनचे महासचिव शरद कदम यांनी व्हॉलिबॉल खेळाचा नियम व अटी याविषयी मार्गदशन केले. तसेच असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर केली. या 22 जिल्ह्यांतील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश म्हात्रे यांनी केले.

जाहीर झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : आमदार नीलेश लंके. उपाध्यक्ष : प्रा. बबन झावरे, सुरेशचंद्र बाविस्कर, डॉ. कौस्तुभ देशमुख. महासचिव : शरद कदम, संजय लाकूड झोडे, सचिन पाटील, प्रफुलचंद्र वाघ, धैर्यशील दळवी, शोएब बेगमपुरे. खजिनदार : रवींद्र म्हात्रे. सहखजिनदार : चंद्रमान ठुबे. सदस्य : दीपक पाटील, हिरामण भोईर, अमित जगताप, विनोद गफार. पंच कमिटी : प्रसन्नकुमार पाटील, सुनील म्हात्रे, स्वप्निल होनमुठे, नरेंद्र महाजन. तांत्रिक कमिटी : रमेश म्हात्रे, राजेंद्र तांबे, दत्तात्रेय बांडे, धीरज घुले.

Back to top button