पुण्यात होत असलेल्या ‘सेक्स तंत्रा’चा योग मनसेच्या रडारवर, तक्रार करणार दाखल | पुढारी

पुण्यात होत असलेल्या 'सेक्स तंत्रा'चा योग मनसेच्या रडारवर, तक्रार करणार दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक बाबीत अग्रेसर असलेल्या पुण्यात आता एक नवाच वाद उद्भवताना दिसतो आहे. पुण्यात ‘सेक्स तंत्र’ या लैंगिक प्रशिक्षण देणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात झळकू लागली आणि पुणेकरांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. पुण्यात 1 ते 3 ऑक्टोबर मध्ये हे सेक्स तंत्र शिबिर पार पडणार आहे. विशेष म्हणजे या शिबिराची प्रवेश फी जवळपास 15000 इतकी आहे.  ऐन नवरात्री दरम्यान हा प्रकार घडत असल्याने पुणेकरांमध्ये नाराजीचा सुर दिसून येतो आहे. पोस्टर व्हायरल झाल्यानंतर एक नवाच वाद समोर येताना दिसतो आहे. मनसे या शिबिर प्रकरणाविरोधात आक्रमक झाली आहे.

या शिबिराविरोधात पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती महिला आघाडी शहराध्यक्षा वनिता वागस्कर यांनी दिली. याशिवाय हिंदू महासभेच्या वतीनेही पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार असल्याचं समोर येत आहे.

कोण आहे या शिबिराचे आयोजक ?
या शिबिराच पोस्टर व्हायरल होताच पोलिसांनी या शिबिरांची चौकशी सुरू केली आहे. आयोजकांच्या यादीत  जाहिरातीमध्ये सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन असे नाव आहे. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याचं समोर येत आहे.

Back to top button