बेळगाव : शेतकऱ्याच्या मुलाची दहावीच्या परीक्षेत भरारी; लोकुर येथील सिद्धांत राज्यात दुसरा | पुढारी

बेळगाव : शेतकऱ्याच्या मुलाची दहावीच्या परीक्षेत भरारी; लोकुर येथील सिद्धांत राज्यात दुसरा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक दहावी बोर्ड परिक्षेत (Karnataka SSLC Result) शेतकऱ्याच्या मुलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील लोकुर गावचा सिद्धार्थ नाईकबा गाडगे या विद्यार्थ्याने ६२५ पैकी ६२४ गुण मिळवले आहेत. गुरुवारी (दि.९) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सिद्धार्थ गाडगे हा आचार्य सुबलसागर प्रौढ विद्या मंदिर येथे शिकत होता. सीमावर्ती भागातील हा विद्यार्थी राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इंग्रजी वगळता सर्व विषयांत त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. सिद्धार्थ हा शेतकरी कुटुंबातील असून त्याच्या कामगिरीबद्दल गावात त्याचे कौतुक केले जात आहे.

यंदाही मुलींचीच बाजी, बागलकोटची अंकिता प्रथम

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाने २०२३-२४ वर्षाच्या दहावी परीक्षा-१ चा निकाल (Karnataka SSLC Result) आज जाहीर केला. यावर्षी ७३.४० टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. कर्नाटक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेदहा वाजता बंगळूर येथील मल्लेश्वरम कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. मेल्लिगेरी मोरारजी रेसिडेन्शिअल स्कूल, बागलकोटची विद्यार्थिनी अंकिता बसप्पा ही राज्यात ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून प्रथम आली आहे. गतवर्षीपेक्षा दहावीच्या निकालात दहा टक्क्यांची घट झाली आहे. गेल्यावर्षी ८३.८९ टक्के निकाल लागला होता.

हेही वाचा : 

Back to top button