पुणे : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत | पुढारी

पुणे : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह साडेसतरानळी येथील विहिरीत आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाजी सुभाष शेळके (22, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नातेवाईकांना शोध घेताना रात्रीच्या सुमारास तरुणाचा मृतदेह साडेसतरानळी येथील विहिरीत तरंगताना दिसला. त्यांनी लागलीच अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यावेळी अडचणीच्या ठिकाणी शिरून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. अग्निशमन अधिकारी प्रशांत मोरे आणि जवानांनी पहाटे दीडच्या सुमारास हा मृतदेह बाहेर काढला.

 

Back to top button