पुणे : सहा वर्षांपासून गुंगारा देणारा अखेर जाळ्यात | पुढारी

पुणे : सहा वर्षांपासून गुंगारा देणारा अखेर जाळ्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सहा वर्षांपासून फरारी असलेल्या आणि मोक्का तसेच मागील आठवड्यातच खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सराईताला वारजे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या सनसिटी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. लखन भास्कर वाघमारे (30, रा. वारजे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाघमारे याच्यावर 2016 साली वारजे पोलिसांनी मोक्का अंतर्गत करवाई केली होती. तेव्हापासून तो फरारी होता. या कालावधीत वाघमारे हा ओळख बदलून वावरत होता.

तो पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, वारजे पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना वाघमारे हा पुणे-मुंबई महामार्गालगत सनसिटी कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांना मिळाली. यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून वाघमारेला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र मुंढे, पोलीस नाईक अमोल भिसे, अमोल राऊत, प्रदीप शेलार, पोलीस शिपाई विकास खिलारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button