तळेगाव येथे बाप्पाच्या आगमनाची उत्साहात तयारी | पुढारी

तळेगाव येथे बाप्पाच्या आगमनाची उत्साहात तयारी

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव स्टेशन परिसरात सार्वजनिक,आणि घरगुती गणेश उत्सवाची जोरात तयारी चालु आहे. जिकडे,तिकडे ढोल पथक अशा पारंपरिक वाद्यांची प्रॕक्टीस उत्साहात सुरु आहे. या मध्ये महिलांचाही सहभाग मोठा आहे. आवाजाने सायंकाळचे दरम्यान परिसर दणाणून जात आहे. तसेच मंडप,स्टेज, उभारण्याचे, डेकोरेशनचे, विद्युत रोषणाईचे कामही जोरात चालू आहे. कार्यक्रमाचे नियोजन ठरत आहे. स्वराज नगरी, तळेगाव स्टेशन चौक, यशवंत नगर, इंद्रायणी वसाहत, जोशीवाडी, मनोहर नगर,आदी ठिकाणी सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाची जोरदार तयारी चालू असून अनेक ठिकाणी कामे उरकत आलेली आहेत.  कार्यकर्ते कामात मग्न आहेत.

गेली २ वर्षे कोरोना पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाचे वेळी निर्बंध होते. यावर्षी कोरोना आटोक्यात आला असुन बहुतांशी निर्बंध उठले असल्यामुळे यार्षी गणेशउत्सव धुमधडाक्यात होणार आहे. घरगुती श्रीगणेश आगमनाची तयारीही उत्साहात सुरु आहे. गणेशांच्या मुर्ती ठरविणे साठी आणि आरासाचे,सजावटीचे सामान आणनेसाठी सहकुटूंब नागरिक बाजारपेठेत जात आहेत. गणेश मुर्तींची आणि आरासाच्या वस्तुंची ठिकाणे आकर्षकरीत्या सजली आहेत. घरांची रंगरंगोटी आणि साफ सफाई चालू आहे. यावर्षी विद्युत रोषणाई, डेकोरेशन, सजावट कारागीरांना,मंडप, व्यावसायीकांना सुगीचे दिवस आले असल्यामुळे ते आनंदात आहेत. गणेशउत्सवाचे वेळी फुलांची मागणी वाढणार असल्यामुळे फुलांचे व्यावसायिक आनंदात आहेत.

Back to top button