पुणे : कोरोना झालेल्यांना फायब्रोसिस; 7 टक्के बाधितांना विकार | पुढारी

पुणे : कोरोना झालेल्यांना फायब्रोसिस; 7 टक्के बाधितांना विकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांंंना कोरोनाचा तीव्र संसर्ग झाला. कोरोनानंतर एक वर्ष उलटूनही यातील अनेक जणांमध्ये फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, दम लागणे, थकवा येणे ही लक्षणे दिसत आहेत. कोरोनानंतर अशा रुग्णांमध्ये ‘फायब्रोसिस’ वाढीस लागल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत संसर्गातून बरे झालेल्या 15 टक्के रुग्णांना थकवा जाणवत आहे, तर 7 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्याचप्रमाणे, फुप्फुसाच्या कार्यक्षमतेवरही विपरित परिणाम होत असल्याने त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

इन्हेलरचे दुष्परिणाम नाहीत
इन्हेलर हे औषध देण्याचे माध्यम आहे. इन्हेलर वापरणे चुकीचे असल्याचे गैरसमज समाजात पाहायला मिळतात. इन्हेलरमध्ये औषधांचे प्रमाण गोळ्यांच्या तुलनेत कमी द्यावे लागते. थोडे औषध वापरून विशिष्ट भागावर परिणाम साधता येतो. तसेच, औषध थेट फुप्फुसात जात असल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असे डॉ. खटावकर यांनी सांगितले.

फायब्रोसिस म्हणजे काय?
पल्मोनरी फायब्रोसिस हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाच्या ऊतींना जखम होते. फायब्रोसिसमुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना त्रास होणे, वजन कमी होणे, थकवा, कोरडा खोकला, अशक्तपणा, अचानकपणे वजन कमी होणे, स्नायू दुखणे ही फायब्रोसिसची लक्षणे आहेत.

…तर औषधे पुन्हा घ्यावी लागतील
पूर्वी दम्याचे निदान झाले असेल आणि सध्या औषधे बंद असतील तर अशा रुग्णांना कोरोनापश्चात औषधे पुन्हा सुरू करावी लागू शकतात. ‘क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज’ अर्थात सीओपीडी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनानंतर फुप्फुसाचा विकार अधिक

Back to top button