पिंपरी : रस्त्यावरील मातीमुळे घसरून दुचाकीस्वार जखमी | पुढारी

पिंपरी : रस्त्यावरील मातीमुळे घसरून दुचाकीस्वार जखमी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने रस्त्यावरून जाणारी अनेक दुचाकी वाहने घसरून पडली. त्यात आठ ते दहा वाहनचालक जखमी झाले. हा प्रकार खंडोबा माळ, भोसरी येथील रस्त्यावर बुधवारी (दि.17) सकाळच्या सुमारास घडला. इतर वाहने घसरू नये म्हणून नागरिकांनी तेथे बॅरिकेट्स उभे केले.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने रस्ता साफ करून घेतला. धूळ व माती साचल्याने पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल तयार होतो. रस्ते निसरटे होतात. निसरड्या रस्त्यावरून जाणारी दुचाकी वाहने वारंवार घसरून पडतात.

Back to top button