पुणे: कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर | पुढारी

पुणे: कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

 

पुणे:  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व राज्यातील नागरिकांचा अवमान करीत आहेत. त्यांनी जरी माफी मागितली असली, तरी ती चालणार नाही, महाराष्ट्र छोडो… असे म्हणत राष्ट्रवादीने मंगळवारी आंदोलन केले.
डेक्कन परिसरातील एफसी रस्त्यावर आंदोलकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह नुकतेच मंत्रिमंडळात समावेश झालेले संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्याही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Back to top button