पुणे : सर्पदंशावर परवडणार्‍या लस निर्मितीसाठी प्रयत्न; डॉ. सदानंद राऊत यांची माहिती | पुढारी

पुणे : सर्पदंशावर परवडणार्‍या लस निर्मितीसाठी प्रयत्न; डॉ. सदानंद राऊत यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘सर्पदंशावरील उपचारांसाठी बराच खर्च येतो. तो कसा कमी करता येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून, सीरम इन्स्टिट्यूटतर्फे सर्पदंशावरील कमी किमतीची प्रभावी लस निर्माण करण्याचे काम सुरू आहे,’ असे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले. पी. एम. शहा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामान्य ते असामान्य’ या कार्यक्रमात डॉ. सदानंद राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी राऊत या दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. लीना बोरुडे आणि फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड. चेतन गांधी यांनी राऊत दाम्पत्याशी संवाद साधला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, उद्योजक सतीश कोंढाळकर व त्यांच्या पत्नी निवेदिता कोंढाळकर उपस्थित होत्या. डॉ. राऊत यांनी आतापर्यंत 5500 पेक्षा अधिक सर्पदंश पीडितांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचविले आहेत.

भारतात अलीकडील काळात सर्पदंश या विषयावर जागरूकता वाढली आहे. ‘शून्य सर्पदंश मृत्यू’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन, प्रशिक्षण आणि उपचार या घटकांवर भर देत आहोत. त्याचबरोबर आगामी काळात सर्पदंश पीडितांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी सर्पदंश उपचाराचे ‘डेडीकेटेड’ केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

                                                                             – डॉ. सदानंद राऊत

 

Back to top button