पुणे : कटऑफ पाहूनच भरा पसंतीक्रम; नामांकित महाविद्यालयांपेक्षा स्थानिक महाविद्यालयांवर भर हवा | पुढारी

पुणे : कटऑफ पाहूनच भरा पसंतीक्रम; नामांकित महाविद्यालयांपेक्षा स्थानिक महाविद्यालयांवर भर हवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘अकरावीसाठी पहिल्या फेरीचे कटऑफ पाहूनच दुसर्‍या फेरीसाठी पसंतीक्रम भरावेत आणि नामांकित महाविद्यालयांचा हट्ट सोडून घराजवळील महाविद्यालयांना प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन प्रवेश परीक्षा समितीने केले आहे.
महाविद्यालयांचे कमी न होणारे कटऑफ आणि विद्यार्थ्यांचा ठराविक महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेण्याचा हट्ट याचा परिणाम म्हणजे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला तरीदेखील केवळ 25 हजार 821 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी संपून आता दुसरी फेरी सुरू झाली आहे.

17 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या दुसर्‍या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत (दि.9) महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. याअंतर्गत शुक्रवारी म्हणजेच 12 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात 17 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 821 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 5 हजार 905 विद्यार्थ्यांनी कोट्यातून अशा एकूण 31 हजार 726 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

प्रवेशासाठी अद्यापही 77 हजार 184 जागा उपलब्ध आहेत. नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ दुसर्‍या फेरीत देखील अर्धा ते एक टक्क्यांनी कमी होतील. त्यामुळे दुसर्‍या फेरीचे पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी त्यांना पडलेले गुण लक्षात घेऊन जर पसंतीक्रम भरले तर त्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तसेच पुढील फेरीची वाट पाहावी लागणार नसल्याचे देखील प्रवेश परीक्षा समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात दुसरी फेरी
महाविद्यालयांचा पसंतीक्रम देणे किंवा नवीन अर्ज करणे ः 7 ते 9 ऑगस्ट
दुसर्‍या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे ः 12 ऑगस्ट
पात्र विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करणे ः 12 ते 17

 

Back to top button