कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जमिनीचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण | पुढारी

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जमिनीचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात महासंचालक रक्षा संपदा विभाग यांच्या निर्देशाद्वारे स्वामित्व योजना राबविण्यात आली होती. या योजनेंतर्गत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीची ए 1, ए 2 जमीन वगळून किती जमीन आहे, याचे
सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ए 1 आणि ए 2 जागा वगळून एकूण 4000 एकरचे सर्वेक्षण होते. ही सर्व जागा 14 पॉकेटसमध्ये विखुरली आहे. त्यामुळे ड्रोनला 10-12 उड्डाणे घ्यावी लागली.

पहिले उड्डाण 27 जूनला तर शेवटचे उड्डाण 5 जुलै रोजी झाले. ऑर्थोरेक्टीफाईड इमेजेस या नावाने याच्या प्रतिमा पाहिल्या जातात. या प्रतिमा 9 जुलै 2022 रोजी बोर्डाला प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती कार्यालय अधीक्षक राजन सावंत यांनी दिली. सर्वांधिक मालमत्ता असलेले देहूरोड कॅन्टोन्मेंट आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे, अनधिकृत्त झोपडपट्ट्या, नवीन बांधकामे यामुळे सहज शोधता येणार आहेत. तसेच, याचा फायदा महसुली उत्पन्न वाढीवर होणार आहे.

Back to top button