पिंपरी : तीन लाख कापडी राष्ट्रध्वजाचा खर्च 72 लाख | पुढारी

पिंपरी : तीन लाख कापडी राष्ट्रध्वजाचा खर्च 72 लाख

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 3 लाख कापडी राष्ट्रध्वज खरेदी करण्यात येणार आहेत. चोवीस रुपये दराने त्यासाठी 72 लाख खर्च करण्यात येणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. 3) मान्यता दिली.
भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असल्याने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम 13 े 15 ऑगस्ट असे तीन दिवस राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने कापडी ध्वज खरेदीसाठी दरपत्रक मागविले.

पिंपरीच्या सिद्धी कॉपियर अ‍ॅण्ड स्टुडन्ट कन्झुमर स्टोअर्स, भोसरीच्या सूरज स्विचगेअर कंपनी आणि चिंचवडच्या अर्थरॉन टेक्नॉलॉजिस एंटरप्रायजेस यांची 14.28 टक्के कमी दर पात्र ठरले. ते 24 रूपये दराने प्रत्येकी 1 लाख ध्वज उपलब्ध करून देणार आहेत.
एकूण 3 लाख कापडी ध्वजासाठी 72 लाख खर्च येणार आहे. त्या खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या ध्वजाची विक्री सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात केली जाणार आहे.

Back to top button