पुणे : इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू | पुढारी

पुणे : इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

पुणे, पुढारी वृत्तसेवा : काम करत असताना इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. दत्तात्रय बाजीराव उमाप (वय.35,रा.गोसावी वस्ती, वैदवाडी हडपसर) असे कामाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी रेखा उमाप (वय.30) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्बेल आर्को सोसायटीचे मॅनेजर आणि ठेकेदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 25 जुलै सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास मार्बल आर्को सोसायटी अ‍ॅमनोराचे मागे हडपसर येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय उमाप हे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर कामगार म्हणून काम करत होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर तेथील साहित्याची आवरा-आवर करताना उमाप हे दुसर्‍या मजल्यावरील पत्र्यावरून पाय घसरून खाली पडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बांधकामाच्या ठिकाणी निर्धारीत नियमानुसार कामगारांच्या जीवीताच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपायोजना व साधनसामग्री पुरवीने आवश्यक असताना, तशी साधनसामग्री न पुवल्यामुळे उमाप यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधीत सोसायटीचे मॅनेजर व ठेकेदारावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button