22 हजार शेतकर्‍यांचे कृषी वीजबिल कोरे; थकबाकी मुक्तीच्या योजनेत 53 हजार 696 | पुढारी

22 हजार शेतकर्‍यांचे कृषी वीजबिल कोरे; थकबाकी मुक्तीच्या योजनेत 53 हजार 696

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 चा लाभ घेत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 21 हजार 969 शेतकर्‍यांनी कृषिपंपांचे थकीत वीजबिल कोरे केले आहे. तर, 53 हजार 696 शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. पुणे परिमंडलातील 1 लाख 26 हजार 459 शेतकर्‍यांकडे एकूण 926 कोटी 64 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून व्याज व दंडमाफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेची एकूण 201 कोटी 81 लाख रुपयांची रक्कम कमी झाली आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांकडे आता 724 कोटी 83 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे.

आतापर्यंत थकबाकीदारांपैकी 53 हजार 696 शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी 125 कोटी 72 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट, असे एकूण 93 कोटी 47 लाख रुपये माफ झाले आहेत. त्यातील 21 हजार 969 शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम असा एकूण 64 कोटी 47 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी 39 कोटी 84 लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

कृषिपंपांच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरणामधून पुणे परिमंडलामधील ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 58 कोटी 60 लाख असे एकूण 117 कोटी 20 लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे करण्यात येत आहे. पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत 1 एप्रिल 2018 पासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या 8 हजार 629 पैकी 7 हजार 845 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, तर 784 वीजजोडण्यांची कामे
प्रगतिपथावर आहेत. जणांचा सहभाग

 

Back to top button