पुणे : ‘पीएमपी’चे 25 मार्ग अल्प उत्पन्नामुळे बंद | पुढारी

पुणे : ‘पीएमपी’चे 25 मार्ग अल्प उत्पन्नामुळे बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाने कमी उत्पन्न देणारे 25 मार्ग बंद केले असून, ज्यादा उत्पन्न देणार्‍या 24 मार्गांवरील बसच्या फेर्‍यांमध्ये ‘पीएमपी’कडून वाढ करण्यात आली आहे. ‘पीएमपी’कडून हे नियोजन मार्गांवरील उत्पन्नात वाढ करण्यासाठी करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील 2 हजार 43 गाड्यांमार्फत शहरात सेवा पुरविली जात आहे. शहरातील या मार्गांवर पीएमपीला किती उत्पन्न मिळते, या मार्गावर प्रवाशांची संख्या किती? या संदर्भात सर्व आगारांच्या आगार प्रमुखांची नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीत पीएमपीच्या वतीने शहरातील तोट्यात असलेले 25 मार्ग बंद करण्याचा निर्णय झाला.

हे आहेत पीएमपीने बंद केलेले 25 मार्ग…
स्वारगेट ते मिडीपॉईंट, मनपा भवन ते आदित्य गार्डन सोसायटी, कात्रज ते कोंढणपूर, तळजाई पठार ते स्वारगेट, उरुळी कांचन ते खामगाव, सासवड ते उरुळी कांचन, हडपसर ते उरुळी कांचन, स्वारगेट ते कात्रजमार्गे लेकटाऊन, वाघोली ते न्हावी सांडस, वाघोली ते देहूगाव, हिंजवडी ते माण फेज- मेगा पॉलिस ते इंटरसिटी फेज 3, चिखली ते हिंजवडी माण फेज 3, भोसरी ते पाबळगांव, राजगुरूनगर ते कुडूस, पिंपळे गुरव ते पिंपळे गुरव मार्गे काटेपुरम, पिंपळे गुरव ते पिंपळे गुरव मार्गे शितळादेवी चौक, स्वारगेट ते सासवड मार्गे बोपदेव घाट, हडपसर- फुरसुंगी हडपसर (वर्तुळ) हरपळेवस्ती, हडपसर- फुरसुंगी हडपसर (वर्तुळ) शेवाळवाडी मधुबन, यवत ते सासवड, शेवाळवाडी ते पिंपरीगाव, डेक्कन ते पिंपळे निलख, डेक्कन ते मिडीपॉईंट.

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांचा आणि ताफ्यातील 6 हजार वाहकांचा नुकताच ऑनलाईन सर्व्हे केला होता. त्यानंतर आगार प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली. त्यात याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर अल्प उत्पन्न देणारे 25 मार्ग बंद करण्यात आले असून, ज्यादा उत्पन्न देणारे दोन नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्यादा उत्पन्न देणार्‍या 24 मार्गांवरील बस गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

                                    – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

 

Back to top button