Uttar Pradesh earthquake: उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

 Earthquake
Earthquake

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिह्याच्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के बसले. रविवारी (दि.२ जून) दुपारी ३ वाजून ४९ मिनटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ही ३.९ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने X पोस्टवरून दिली आहे.

भूकंपामुळे जिल्ह्यात घबराट पसरली असून लोक घाबरून घराबाहेर पडले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ३.९  इतकी मोजली गेली आहे, मात्र यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news