खडकवासला : ग्रामपंचायत उमेदवारांची होतेय दमछाक | पुढारी

खडकवासला : ग्रामपंचायत उमेदवारांची होतेय दमछाक

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: निवडणूक आयोगाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पश्चिम हवेलीतील खानापूर व मालखेड ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची प्रचारापेक्षा ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. उमेदवारांना ट्रू व्होटर अ‍ॅपवर निवडणुकीचा खर्च सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांना झूम मीटिंगच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.

महिला, अल्पशिक्षितांसह बहुतांश उमेदवारांना या किचकट प्रक्रियेचा फटका बसला आहे. मालखेडसारख्या ग्रामीण भागात मोबाईल फोनला रेंजही नाही. खानापूर ग्रामपंचायतीचे येत आहेत. याबाबत तहसीलदारांना माहिती देण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून झूम मीटिंगच्या माध्यमातून याची उमेदवारांना माहिती दिली जाते. असे असले तरी प्रत्यक्षात ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रंगणार चुरशीच्या लढती
मालखेड व खानापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. भरपावसात उमेदवार प्रचार करत आहेत. तरुण उमेदवारांची संख्या मोठी आहे. मालखेड येथे 7 जागांसाठी 14, तर खानापूरच्या 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. दुसर्‍या दिवशी 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

सुशिक्षितानांही नेमकी माहिती मिळत नाही. अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून खर्च कसा सादर करावा, याचे मोठे आव्हान उभे आहे.

                                                                             – केतन जावळकर, खानापूर

Back to top button