‘मातृ वंदना’योजनेचा अडीच लाख जणींना लाभ | पुढारी

‘मातृ वंदना’योजनेचा अडीच लाख जणींना लाभ

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ 2 लाख 71 हजार 341 लाभार्थ्यांना देण्यात आला. या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे बँक खात्यावर 113 कोटी 63 लाख 28 हजार रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येते. गरोदर असणार्‍या किंवा प्रसूत झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन टप्प्यांत पाच हजार रुपये अनुदान देण्यात येते.

लाभार्थी
2 लाख 71 हजार 341

वाटप झालेले अनुदान
113 कोटी 63 लाख 28 हजार रुपये

यांना मिळत नाही लाभ…
गरोदर किंवा स्तनदा माता ज्या केंद्र, राज्य शासनाच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत, अशा मातांना लाभ मिळत नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील, त्यांनाही हा लाभ मिळत नाही.

महापालिका क्षेत्रात लाभार्थी
पुणे – 67,198
पिंपरी-चिंचवड – 51,143

जिल्ह्यातील स्थिती
तालुक्याचे – नाव लाभार्थी
आंबेगाव – 7,259
बारामती – 13,592
भोर – 5,433
दौंड – 11,974
हवेली – 37,077
इंदापूर – 12,675
जुन्नर – 9,798
खेड – 13,663
मावळ – 11,568
मुळशी – 6,684
पुरंदर – 7,464
शिरूर – 14,542
वेल्हा – 1,268

अनुदानाचे तीन टप्पे…

पहिला – 150 दिवसांत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यावर 1 हजार रुपयांचा हप्ता.
दुसरा – गरोदरपणाच्या काळात सहा महिन्यांनंतर किमान एक तपासणी केल्यानंतर 2 हजार रुपयांचा हप्ता.
तिसरा – बाळाच्या जन्मानंतर बाळाचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्याला मिळतो.

ही कागदपत्रे आवश्यक
शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केलेले लाभार्थ्याचे कार्ड
बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत
पती व पत्नी यांचे आधार कार्ड
बाळाच्या जन्माचा दाखला व प्राथमिक लसीकरण झालेले कार्ड

Back to top button