‘खडकवासला’तील विसर्ग बंद | पुढारी

‘खडकवासला’तील विसर्ग बंद

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पावसाने उघडीप दिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग मंगळवारी बंद करण्यात आला. पानशेत-वरसगाव खोर्‍यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ सुरू आहे. धरण साखळीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 19.09 टीएमसी (65.48 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.

खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग बंद केला असला, तरी कालव्यात 1005 क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक अपवाद वगळता दिवसभर उघडीप होती. सायंकाळी सहा नंतर सिंहगड, आंबी भागात हलक्या सरी पडल्या. ओढे नाल्यातून पाणी धरणांत जमा होत आहे. पानशेत खोर्‍यातही पावसाचा जोर कमी झाला आहे.

सायंकाळी पाच वाजताचा पाणीसाठा
खडकवासला 100 टक्के,. वरसगाव धरणात 61.85 टक्के, पानशेतमध्ये 68 टक्के व टेमघरमध्ये 52.46 टक्के साठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत जवळपास दुप्पट पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 19 जुलै 2021 रोजी साखळीत 10.12 टीएमसी म्हणजे 34.72 टक्के साठा होता.

Back to top button