पुणे : मिरची, शेंगदाणा, मिलबर गहू, रवा, मैद्याच्या दरात वाढ | पुढारी

पुणे : मिरची, शेंगदाणा, मिलबर गहू, रवा, मैद्याच्या दरात वाढ

पुणे : गेल्या आठवड्यात येथील घाऊक बाजारात मिरची, शेंगदाणा, मिलबर गहू, आटा, रवा आणि मैद्याच्या दरात आणखी मोठी वाढ झाली. मात्र खाद्यतेलांमधील घसरण सुरूच असून गेल्या आठवड्यातही दरात मोठी घट झाली. गतवर्षी मिरची उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली. यंदाही मिरचीचे उत्पादन कमी क्षेत्रात घेण्यात येत असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मिरचीचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढीस चालना मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सर्व प्रकारच्या मिरचीच्या दरात क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांनी वाढ झाली आहे. आवक कमी असून मागणी चांगली असून आवक कमी प्रमाणात होत आहे. यामुळे शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. साबुदाणा, पोहे, नारळ या जिनसांची उलाढाल कमी प्रमाणात असल्याने दर स्थिर होते.

गहू, आटा, रवा, मैद्याची आणखी दरवाढ
मागणी वाढली असून पुरवठा कमी असल्यामुळे आटा, रवा आणि मैदा तयार करण्यासाठी लागणार्या मिलबर गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसातच क्विंटलमागे सुमारे 150 रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी, आटा, रवा आणि मैद्याच्या दरात गेल्या आठवड्यातही 50 किलोच्या पोत्यामागे आणखी 50 ते 75 रुपयांनी वाढ झाली. तांदळाची दरवाढ कायम असून मागणी साधारण असल्यामुळे ज्वारी आणि बाजरीचे दर सर्वसाधारणपणे स्थिर होते. तुरडाळ आणि हरभराडाळीतील तेजी कायम असल्याचे आढळले.

खाद्यतेले आणखी उतरली
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि पामोलिन तेलाचा पुरवठा वाढला असून मागणी मात्र एकदम कमी झाली आहे. परिणामी, आयाती तेलांची पडतळ वाढल्याने स्थानिक बाजारातही सर्वच खाद्यतेलांमधील घसरण सुरुच आहे. गेल्या आठवडयातही पामोलिन तेलाचे दर डब्यामागे आणखी 100 ते 125 रुपयांनी तर सुर्यफूल तेलाचे दर 15 किलोच्या डब्यामागे 50 रुपयांनी आणि वनस्पती तुपाचे दर 100 रुपयांनी उतरले. शेंगदाणा आणि सरकी तेलाचे दर स्थिर होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3500-3550 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2700-2750, रिफाईंड तेलः 2500-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 1950-2200, पामतेल 1700-1950, सूर्यफूल रिफाईंड तेल 2400-2600, वनस्पती तूप 1725-2450, खोबरेल तेल 2450-2500 रु.

तांदूळ : गुजरात उकडा 3500-3800, मसुरी 3300-3500, सोनामसूरी 4000-4300, एच.एम.टी. लम 4700-5000, लचकारी कोलम 5000-5500, चिन्नोर 4000-4500, 1121-1000-10500, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11000-12000, बासमती दुबार 8000-9000, बासमती तिबार 9000-10000, बासमती मोगरा 5000-5500, बासमती कणी 3000-3500, 1509- 7500-8500 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3400-3700, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3300, एम.पी.लोकवन 2800-3200, सिहोर नं. 1 4800-5500, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2625-2650 रु.

ज्वारी : गावरान नं. 1-4200-4500, गावरान नं. 2-3400-3800, नं. 3 3000-3200, दूरी 2850-2950
बाजरी : महिको 3000-3200, गावरान 2700-2800, हायब्रीड 2600 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा 3700-3900, गूळ नं.1 3500-3650, गूळ नं.2 3350-3450, गूळ नं.3200-3300, बॉक्स पॅकिंग 3500-4600 रु.

डाळी : तूरडाळ 9000-10000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 8500-8700, मसूरडाळ 8500-8600, मटकीडाळ 11500-11800, उडीदडाळ 90000-10300 रु.
कडधान्ये : हरभरा 5500-5600, हुलगा- 6500, चवळी 7500, चवळी भारी 8000 मसूर 7600- 7700, मूग 7200-7500, मटकी गावरान 12500, मटकी पॉलिश 10000, मटकी गुजरात 10000, मटकी राजस्थान 10000, मटकी सेलम 13000-13500, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 6400-6500, काबुली चणा 9000-11000 रु.

साबुदाणा : साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा नं.2 5200, साबुदाणा नं.3 5000 रु. वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1500-1800 रु. शेंगदाणा : जाडा 10500-11000, स्पॅनिश – 11000, घुंगरु 10200, टीजे 9100 रु. धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल 2450-2550, पिवळा 2475-2525, पांढरा 2700-2900 रु.

पोहे : मध्य प्रदेश 3600-3800, पेण 3400-3600 मध्यम पोहा-3400-3600, दगडी पोहा 3200- 3800, पातळ पोहा 4100-4500, सुपर पोहा 3800-4200, भाजका पोहा 450-525, मका पोहा 575-650, भाजके डाळे 2900-3400, मुरमुरा (10 किलोस) 430-440, भडंग 650-750, घोटी 430, सुरती 440 रु.

रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1450-1525, रवा 1475-1575, मैदा 1425-1475 रु. बेसन : (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु. नारळ : (शेकड्याचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1300-1350, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1450-1500, सापसोल 2000-2500 रु.

Back to top button