पिंपळे गुरव : पदपथावरील खड्डयामुळे अपघाताचा धोका | पुढारी

पिंपळे गुरव : पदपथावरील खड्डयामुळे अपघाताचा धोका

पिंपळे गुरव :  येथील महादेव मंदिराजवळील केबलच्या वायरीचा खड्ड्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपळे गुरव परिसरातील पदपथांवरच कामाचा राडारोडा पडलेला दिसून येत आहे. तसेच, चेंबरही झाकणाविना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात जागोजागी खड्डे पडले आहेत.

त्यामुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. पिंपळे गुरव येथील बाजारपेठ, शाळा, दवाखाना आदी गजबजलेल्या परिसर चिखलमय झाला आहे. तसेच, खडी पसरल्याने चालायचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जवळकर रस्त्यावर चारचाकी वाहने चिखलात अडकण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत अनेकवेळा पालिका आयुक्तांकडे ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती.

Back to top button