तळेगाव स्टेशन तळ्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ | पुढारी

तळेगाव स्टेशन तळ्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ

तळेगाव स्टेशन :  तळेगाव परिसरात आठवड्या पासून धुवाधार पाऊस पडत असून वीजमंडळा जवळील तळेगाव स्टेशन तलावाच्या पाण्याचे पातळीत वाढ झाली असून तेथील परिसर निसर्ग रम्य झाला आहे. तलावावरील झुडपे आणि लागवड केलेली झाडे पावसाचे पाण्यानी बहरली आहेत.

तलावावर भरपूर चिखल झालाअसून तेथुन वाहने जाणे अशक्य झाले आहे.भरावावरुन काही ठिकाणी चालत फिरणेही अवघड झाले आहे. काही नागरिक तलावाचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी चिखलातूनही येत आहेत.तलावाचे भोवताली राहणाऱ्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तलावावर काही अनर्थ घडु नये यासाठी प्रशासनाने तेथे सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक आहे अशी नागरिकांची मागणी आहे.

Back to top button