खंडाळा बोगद्यात कार जळून खाक | पुढारी

खंडाळा बोगद्यात कार जळून खाक

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई दु्रतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात शुक्रवारी (दि. 15) दुपारी एक कार जळून खाक झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बोगद्यात एका कारने अचानक पेट घेतला.

आग लागल्याचे समजताच चालकाने कार थांबवली आणि कारमधील सर्वजण तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती समजताच खंडाळा महामार्ग पोलिस, आयआरबी व देवदूत पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

Back to top button