पिंपरी : शहरातील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास | पुढारी

पिंपरी : शहरातील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास

मिलिंद कांबळे : 
पिंपरी : म्हाडाच्या मोरवाडीमधील संत ज्ञानेश्वरनगर येथील दोन जुन्या धोकादायक इमारती पाडून तेथे नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत. एकूण 208 सदनिकाधारकांना 280 ऐवजी 570 चौरस फुटांचे नवे प्रशस्त घर मिळणार असल्याने ते आनंदीत आहेत. म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हल्पमेंट) होण्याचा हा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे इतर धोकादायक इमारतींचा रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न निकाली निघू शकतो.

म्हाडाने सन 2001 मध्ये मोरवाडीत 4 हजार स्केअर फूट जागेत 4 मजली संकल्प व ओंकार या दोन इमारती उभ्या केल्या. त्यात प्रत्येकी 104 असा एकूण 204 सदनिकाधारक आहेत. एका सदनिकेचे क्षेत्रफळ 280 चौरस फूट आहे. बांधकाम 20 वर्षे जुने असल्याने धोकादायक झाले आहे. छतातून गळती होत असून, इमारत मोडकळीस आली आहे. तसेच, कुटुंबातील सदस्य वाढल्याने सदनिका अपुर्‍या पडत आहेत.

दोन्ही हाऊसिंग सोसायटींनी एकत्रित येत इमारतीचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करून घेतले. इमारत धोकादायक झाल्याने ती कधीही पडू शकते. त्यामुळे रिडेव्हल्पमेंटचा प्रस्ताव म्हाडाला सादर करण्यात आला. दोन्ही सोसायटींनी एकत्रित येत म्हाडा तसेच, राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. सर्व सोसायट्या एकत्र आल्याशिवाय रिडेव्हल्पमेंट करता येणार नाही, असा राज्य शासनाचा नवीन अध्यादेश आहे. तो अध्यादेश सोसायटीसाठी सहायक ठरला.

प्रस्तावाला म्हाडाने मंजुरी दिली. रिडेव्हल्पमेंटसाठी विकसकही तयार आहे. रिडेव्हल्पमेंट संदर्भात सोसायटी, विकसक व म्हाडासोबत नुकताच सामंजस्य करारही (एमओव्ही) झाला आहे. त्यामुळे लवकरच जुनी इमारत पाडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू
होणार आहे

Back to top button