दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू | पुढारी

दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

मांजरी : पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक येथे महादेव मंदिर वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. ईश्वरकुमार राजेंद्रकुमार पुनिया (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून, स्वराज नामक तरुण जखमी झाला आहे.
अर्धवट काम करून अपघातास कारणीभूत ठरल्यावरून मांजरी बुद्रुक सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारावर आणि संबंधित पीएमआरडीए अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे यांनी केली आहे.

याबाबत साळवे म्हणाले, ‘मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंत पीएमआरडीएकडून सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे हे काम वाहनचालकांना धोकादायक ठरत असून, रोज त्या ठिकाणी अपघात होत असून, ठेकेदार व अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत.’ शनिवारी झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काम करणारे ठेकेदार व पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी साळवे तसेच शैलेंद्र बेल्हेकर यांनी केली आहे.

Back to top button