आंबेगावातील अंगणवाड्यांना निधी | पुढारी

आंबेगावातील अंगणवाड्यांना निधी

मंचर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगावातील अंगणवाड्यांमध्ये वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 35 अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी 31 हजार 900 रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले. एकात्मिक बालविकास सेवायोजना महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी राबविली जाते.अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.

अंगणवाडी केंद्रासाठी वीज, नळजोड आणि फॅनची सुविधा, बोलक्या भिंती करणे यासह सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापेकी बहुतेक प्रश्न मार्गी लागले आहेत. आता अंगणवाड्यांना बोलक्या भिंती रंगविण्यासाठी निधी देण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यातील 411 अंगणवाड्यांपैकी 243 अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित 168 पैकी 35 अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या करण्यात येणार आहेत. यामध्ये आंबेगाव प्रकल्पातील 15 व मंचर प्रकल्पातील 20 अंगणवाड्यांचा समावेश आहे.

Back to top button