तळेगाव परिसरात निसर्ग बहरत आहे | पुढारी

तळेगाव परिसरात निसर्ग बहरत आहे

तळेगाव स्टेशन-पुढारी वृत्त : तळेगाव दाभाडे तसेच मावळ परिसरात सध्या रम्य पावसाळी वातावरण असून निसर्ग बहरत आहे. पाऊस अधून मधून उघडत असला तरी जोर कायम आहे. धबधबे वाहत आहेत. लोणावळा,खंडाळा,कार्ला, पवनानगर,वडेश्वर,तळेगाव,श्री चौराई माता डोंगर परिसर,श्री घोरावाडीश्वर डोंगर परिसर,कुंड मळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसर आदी ठिकाणी भाविक आणि पर्यटक येण्याचे प्रमाण वाढत वरचेवर वाढत आहे.

पर्यटकांवर अवलंबून असणारे चिक्की,मकाची कणसे,भेळ,पाणीपूरी,भुईमुगाच्या शेंगा विकणारे हॉटेल,लॉज आदी छोटे – मोठे व्यावसायिक आनंदात आहेत. लोणावळा,खंडाळाठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. असलेमुळे पर्यटकांचे पवनानगर धरण परिसर,कार्ला परिसर येथे आगमन होत आहे. भुशी डॕम,कुंड मळा आदी ठिकाणी जिवीत हानी होत असून अशा ठिकाणी पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.प्रशासनाने देखील सुरक्षा व्यवस्था कडक केली पाहीजे.

Back to top button