तळेगाव स्टेशन परिसरात रात्रभर पावसाची रिपरिप | पुढारी

तळेगाव स्टेशन परिसरात रात्रभर पावसाची रिपरिप

तळेगाव स्टेशन : तळेगाव स्टेशन परिसरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी (दि.6) पहाटेपासून सकाळपर्यंत संततधार पाऊस पडत होता. पावसामुळे तळेगाव स्टेशन भागात इंद्रायणी कॉलनी, मनोहर नगर ,वतन नगर,यशवंत नगर,स्टेशन चौक, आदी उपनगरातील रस्त्यांवर आणि खड्डयांत पाणी साचले होते.

वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. वाहनांमुळे पाणी अंगावर उडू नये म्हणून पायी चालणार्‍यांची तारांबळ उडत होती. वीज कार्यालया जवळील तलाव परिसर पावसाामुळे चिखलमय झाला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास तळ्यातील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे याठिकाणी प्रशासनाने तेथे सुरक्षाव्यवस्था ठेवणे आवश्यक आहे.

Back to top button