पिंपरी : दुकानात सिगारेट नसल्याने तोडफोड | पुढारी

पिंपरी : दुकानात सिगारेट नसल्याने तोडफोड

पिंपरी : किराणा दुकानदात सिगारेट नसल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुकानाची तोडफोड केली. तसेच, दुकानदाराच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे आठच्या सुमारास बोपखेल येथे घडली. लक्ष्मण गेवरजी भाटी (42, रा. बोपखेल) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, यश उर्फ बबलू मारुती दिसले, तेजस खरात, तुषार डोंगरे, बबलू गुलाब घुले, तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या घराशेजारी किराणा मालाचे दुकान आहे. येथे आरोपींनी सिगारेटबाबत विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांनी दुकानात सिगारेट नसल्याचे आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. तसेच, दुकानाच्या मालकीण आणि त्यांच्या नातेवाईकांना ढकलून दगडफेक केली. यात एकजण जखमी झाला आहे.

Back to top button