पिंपरी : महिलेच्या पर्समधील दागिने चोरीला | पुढारी

पिंपरी : महिलेच्या पर्समधील दागिने चोरीला

पिंपरी : महिलेच्या पर्समधील एक लाख 86 हजार 20 रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) दुपारी काळभोरनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळवडे येथून काळभोरनगरकडे जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पर्सची चेन उघडी राहिली. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून 60 हजारांचा राणीहार, एक लाख 13 हजार 70 रुपयांचे गंठण, 10 हजार 950 रुपयांची सोन्याची सोन्याची नथ, असे एक लाख 86 हजार 20 रुपयांचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button