पुणे : लोखंडी पोल चोरीला
पुणे : एसआरपीएफ ग्रुप 2 वानवडी येथील रामटेकडी डोंगराच्या हनुमान मंदिराजवळ असलेल्या तारेच्या फिनिशिंगचे लोखंडी पोल चोरट्यांनी चोरी केले. 27 हजार 900 रुपयांचे 279 पोल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. गस्तीवर असलेल्या कर्मचार्यांना चार व्यक्ती पोल कापत असल्याचे दिसून आले.
त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फरार झाले. या वेळी त्यांची एक दुचाकी पोलिसांच्या हाती लागली आहे.
याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार भूषण देसाई (एसआरपीएफ ग्रुप 2) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.