बकरी ईदसाठी लक्ष्मी बाजारात बोकड दाखल | पुढारी

बकरी ईदसाठी लक्ष्मी बाजारात बोकड दाखल

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा: बकरी ईदचा सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी लागणारे बोकड औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, परभणी, मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणांहून भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. ग्राहकांनीही बोकड खरेदीसाठी रविवार (दि.3) लक्ष्मी बाजारात व बाजाराबाहेरील रस्त्यावर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

लक्ष्मी बाजारातील उस्मानाबादी गावरान बोकडाला विशेष मागणी आहे. साधारणतः 10 ते 12 हजारांपासून ते 25 हजारांच्या पुढे किमतीचे बोकड येथे विकण्यासाठी ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले. तसेच 60 हजार, 1 लाख रुपये किमतीचे बोकडसुद्धा येथे विक्रीला येत असतात.

पुणे शहरातील हा एकमेव बोकड बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. हा बाजार 1917 पासून सुरू असून, वर्षभर येथे बोकड बाजार सुरू असतो. नवस फोडण्यासाठी ग्राहक येथून बोकड खरेदी करीत असतात.

                                  -अरुण घोलप, अध्यक्ष, पुणे शहर हिंदू खाटीक समाज

Back to top button