पुणेशहरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

पुणेशहरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

पुणे:  पुढारी वृत्तसेवा; शहराला सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवडाभरासाठी ही कपात असून पावसाचा अंदाज घेऊन ती वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार, अर्ध्या भागाला एक दिवशी तर उर्वरित भागाला दुसर्‍या दिवशी असे सम- विषम तारखाप्रमाणे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी ज्या भागाला पाणीपुरवठा होईल त्या भागाला थेट बुधवारीच पाणीपुरवठा होणार आहे.

आज या भागात होणार पाणीपुरवठा
पश्चिम उपनगरांतील संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, बालाजीनगर संपूर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरानगर, अपर, पद्मावती, चव्हाणनगर, अपर पंपिंग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वतीदर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, औंध, सकाळनगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरूड, जय भवानीनगर, किष्किंधानगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शास्त्रीनगर, आनंदनगर, वनदेवी मंदिर, श्रमिकनगर, बावधन बु., भुसारी कॉलनी, मयूर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वेनगर, अहिरे गाव, धानोरी गावठाण, लोहगाव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगाव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा.

पाणीसाठा
खडकवासला
0.52 टीएमसी

वरसगाव
1.02 टीएमसी

टेमघर
0.10 टीएमसी

पानशेत
1.06 टीएमसी
एकूण पाणी साठा
2.60 टीएमसी

गतवर्षीचा आज अखेरचा
पाणीसाठा : 8.70 टीएमसी

Back to top button