अखेर पुण्यात दिवसाआड पाणी; पालिकेकडून वेळापत्रक जाहीर | पुढारी

अखेर पुण्यात दिवसाआड पाणी; पालिकेकडून वेळापत्रक जाहीर

पुणे: पुढारी वृत्तसेवा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून येत्या सोमवारपासून (दि. 4) शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिकेने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळा सुरू होऊन महिना संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत अवघा अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. महापालिकेने पाणीकपात न केल्यास हे पाणी शहराला 15 जुलैपर्यंतच पुरेल असा निर्वाणीचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत मात्र बदल करण्यात आलेला नाही. खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. मात्र, या पावसाचा जोर कमी आहे. आठवडाभरानंतर धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पालिकेने https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

समाविष्ट गावांत पाणीकपात नाही
महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 11 आणि 23 अशा 34 गावांमध्ये ग्रामपंचायतीने निर्माण केलेली यंत्रणा आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या गावांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
4, 6, 8 व 10 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमान नगर, जांभुळवाडी रोड, बालाजीनगर संपूर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरानगर, अपर, पद्मावती, चव्हाणनगर, अपर पंपिंग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वतीदर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, औंध, सकाळनगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरूड, जय भवानीनगर, किष्किंधानगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शास्त्रीनगर, आनंदनगर, वनदेवी मंदिर, श्रमिकनगर, बावधन बु., भुसारी कॉलनी, मयूर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वेनगर, अहिरे गाव, धानोरी गावठाण, लोहगाव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगाव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा

5, 7, 9 व 11 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर
वडगाव जलकेंद्र परिसर, उंबर्‍या गणपती चौक, नांदेड फाटा, धायरी, राजस सोसायटी, वडगाव गावठाण, वडगाव बु., जयभवानीनगर, माणिकबाग, हिंगणे परिसर, तुकाईनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, वंडरसिटी, आंबेगाव पठार, सहकारनगर, आंबेगाव बु., दांडेकर पूल, नवीन पेठ, दत्तवाडी, सर्व पेठा, टिळक रस्ता, स्वारगेट परिसर, जनता वसाहत, पर्वती जलकेंद्र परिसर, चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग, गोखलेनगर, भोसलेनगर, जनवाडी, वैदूवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता परिसर, लॉ कॉलेज रस्ता परिसर, भांडारकर रस्ता परिसर, प्रभात रस्ता परिसर, डेक्कन, जंगली महाराज रस्ता परिसर, बोपोडी, खडकी रेल्वे स्टेशन परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता परिसर, बाणेर गाव, बालेवाडी, सूस रोड, बाणेर- पाषाण लिंक रस्ता परिसर, सायकर मळा, सुतारवाडी परिसर, सूस गाव म्हाळुंगे, चांदणी चौक, बावधन बु., दशभुजा गणपती, नळ स्टॉप, मंबई-पुणे बायपास दोन्ही बाजू, वारजे, माळवाडी, वारजे जुना जकात नाका परिसर, इंगळेनगर, कळस, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, साकोरेनगर, विमाननगर, रामवाडी, मुळीकनगर, वडगाव शेरी, टेम्पो चौक, गलांडे वस्ती, साईनगर, संपूर्ण येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, फुलेनगर, टिंगरेनगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, वैदूवाडी, हडपसर गावठाण, सय्यदनगर, ससाणेनगर, काळेबोराटेनगर, वानवडी, आझादनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी.

Back to top button