इंदापूर प्रशासकीय भवनासमोर रस्ता दुरुस्ती सुरू | पुढारी

इंदापूर प्रशासकीय भवनासमोर रस्ता दुरुस्ती सुरू

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरातील शंभर फुटी रस्त्याची प्रशासकीय भवनासमोर दुरवस्था झाली होती ती रस्ता दुरुस्ती आता सुरू झाली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यांमुळे प्रवाशांचे अत्यंत हाल होत असल्याने या रस्त्याची तातडीने डागडुजी व्हावी अशा आशयाचे वृत्त दै.‘पुढारी’ने ‘प्रशासकीय भवनासमोर रस्त्यावर खड्डे’ या मथळ्याखाली मंगळवारी (दि.28) प्रसिद्ध केले होते.

प्रशासनाने या वृत्ताची तत्काळ दखल घेत गुरुवार (दि.30) पासून या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 2 आणि 3 जुलै दोन दिवस इंदापूर शहरात मुक्कामी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात का होईन या रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने नागरिकांसह वाहन चालक व भविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button