‘घोडगंगा’च्या 21 जागांसाठी 182 उमेदवारी अर्ज | पुढारी

‘घोडगंगा’च्या 21 जागांसाठी 182 उमेदवारी अर्ज

शिरूर : पुढारी वृत्तसेवा: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवार (दि.30) अखेरच्या दिवशीपर्यंत एकूण 21 संचालकपदाच्या जागांसाठी 182 उमेदवारांनी अर्ज भरले. 31 जुलै रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दिली.

ऊस उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचे मांडवगण फराटा, इनामगाव, वडगाव रासाई या तीन गटांतून प्रत्येकी दोन, न्हावरे, तळेगाव ढमढेरे, शिरूर गट या तीन गटांतून प्रत्येकी तीन, तसेच उत्पादक/बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थांच्या प्रतिनिधींच्या गटातून एक,अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी गटातून एक, महिला राखीव प्रतिनिधी गटातून दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी भटक्या विमुक्त जाती/जमाती एक व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक, अशा एकूण 21 जागी संचालक निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल व माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्या प्रमुख पॅनेलमध्ये लढत अपेक्षित आहे.

Back to top button