पुणे : वरंध घाटात दरड कोसळली | पुढारी

पुणे : वरंध घाटात दरड कोसळली

भोर : पुढारी वृत्तसेवा : वरंध घाटात बुधवारी (दि. 29) सकाळी 11 च्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये हॉटेल व्यावसायिक अरुण उंब्राटकर जखमी झाले. घटनास्थळाची भोर-महाड तालुक्यातील प्रशासनाने पाहणी करून धोकादायक हॉटेल व्यावसायिकांना टपर्‍या हटविण्याचे आदेश दिले.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

भोर-महाड रस्त्यावरील उंब्राटकरवाडीच्या हद्दीतील वरंध घाटातील श्री वाघजाई मंदिराजवळील दरड कोसळली. हॉटेल व्यावसायिक अरुण गणपत उंब्राटकर (वय 55) हे गंभीर जखमी झाले. महाड येथील रेक्यू टीमच्या मदतीने त्यांना बाहेर काढून महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, मंडलाधिकारी पांडुरंग लहारे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

पावसाळ्याच्या दिवसांत वरंध घाट निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने पर्यटक येत असतात. घाटातील 6 ते 7 हॉटेलमध्ये गरमागरम कांदाभजी, चहाचा आस्वाद घेत असतात. मात्र, हे व्यावसायिक धोकादायक अवस्थेत व्यवसाय करीत आहेत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी व्यवसाय करावा.

                                                                           – राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, भोर

Back to top button