पुणे : डिंभे डावा कालवा दुरुस्तीला प्रारंभ | पुढारी

पुणे : डिंभे डावा कालवा दुरुस्तीला प्रारंभ

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वारुळवाडी येथील कृषी विज्ञान केंद्राजवळून जाणार्‍या डिंभे डावा कालव्यात असणारी झाडेझुडपे या विभागाकडून काढली जात आहेत. तसेच, महामार्गावरील पुलाखालील कालव्याच्या वाहून गेलेल्या भागाच्या डागडुजीसही सुरुवात केली आहे. दैनिक ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. वृत्तानंतर कुकडी पाटबंधारे विभागाला जाग आली असून, त्यांनी तातडीने कामास सुरुवात केली आहे.

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

कृषी विज्ञान केंद्राजवळील डिंभे डावा कालव्याच्या दोन्ही बाजूस झाडेझुडपे वाढून कालव्यातून जाणार्‍या पाण्यात अडथळा होत आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर साई मंदिराकडे वळणार्‍या पुलाखालील याच कालव्याचा बराचसा भाग वाहून गेला आहे. जोराचा पाऊस झाल्यास महामार्गाला व कालव्याला धोका निर्माण होणार असून, जीवितहानीची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने दि. 19 जून रोजी प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत कुकडी पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यावरील झुडपे काढून पुलाखालील वाहून गेलेल्या भागाची डागडुजी सुरू केली आहे.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

कुकडी प्रकल्पासंदर्भातील अडीअडचणींबाबत 24 जून रोजी मुंबई येथे बैठक झाली. बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आ. अतुल बेनके यांच्या सूचनेनुसार वारुळवाडी येथील डिंभे डावा कालव्यावरील 55 किलोमीटर परिसरात ज्या ठिकाणी मोठे भराव आहेत किंवा मोठ्या प्रमाणात गळती होत आहे, अस्तरीकरण निघाले आहे, काही ठिकाणी भिंती ढासळल्या आहेत अशा ठिकाणी तातडीने काम होणार आहे. कालव्यावरील झाडेझुडपेही काढणार आहे.

                               – प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग

Back to top button