पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. तर १३ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीसाठी १५ मे रोजी अधिसूचना जारी होईल. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २२ मे आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी २७ मे अंतिम मुदत असेल. १० जून रोजी मतदान होऊन १३ जूनला निकाल जाहीर होईल.
मुंबई पदवीधर संघातील सदस्य विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील सदस्य कपिल हरिशचंद्र पाटील यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. या ठिकाणी आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या मतदारसंघात आता आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
हे ही वाचा :