पुणे : झाडाला चक्रासन घालणार्‍या बालयोग्याने दिले योगाचे धडे | पुढारी

पुणे : झाडाला चक्रासन घालणार्‍या बालयोग्याने दिले योगाचे धडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय योगपटू सिद्धेश विठ्ठल कडू या बालयोग्याने झाडाला चक्रासन घालत योगाचे धडे दिले. जागतिक योग दिनानिमित्त साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ पुणे यांनी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष योगा वर्गाचे आयोजन केले.

राष्ट्रीय योगपटू सिद्धेश विठ्ठल कडू या बालयोग्याने अनेक आसनांचे याप्रसंगी सादरीकरण केले. विशेषतः त्याने झाडाला घातलेल्या चक्रासनाने सर्वांचेच डोळे दीपून गेले. ‘विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम योगासने व ध्यान करावा, त्यांनी आपली एकाग्रता, बुद्धिमत्ता वाढेल त्याचा शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये खूप सकारात्मक बदल निश्चित आपल्याला जाणवेल,’ असे पीयूष शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या आलिशान बुगाटी कारचा चक्काचूर

याप्रसंगी राष्ट्रीय योगपटू असणार्‍या सिद्धेश, त्याची बहीण नारायणी आणि त्याचे वडील विठ्ठल कडू यांनी चक्रासन, धनुरासन, शलभासन, गण्डभेरुण्डासन, वृश्चिकासन, वालखिल्यासन, डिंभासन, कोकिळ भुजंगासन, पार्श्वपद्मासन, हनुमानासन, राजकपोतासन, पूर्ण भुजंगासन, उष्ट्रासन, सुप्त व—जासन अशी एकापेक्षा एक अवघड योगासने प्रात्यक्षिक सादर केले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन केले.

या वेळी स्कूलच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक प्रीतम जोशी, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्याचबरोबर मंडळाचे सतीश नहार, नरेंद्र व्यास, अभिषेक मारणे, गंधाली शहा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. शिक्षिका अनघा पोळेकर यांनी प्रास्ताविक केले.

Back to top button