

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कुटुंबीयांसह मजोरका बेटावर सुट्टीसाठी गेलेल्या स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या 16 कोटींच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात बुगाटी कारची पूर्णपणे वाट लागली आहे; परंतु कोणाला दुखापत झालेली नाही. अपघात झाला तेव्हा कारमध्ये रोनाल्डोचा एक अंगरक्षक होता, रोनाल्डो कारमध्ये नव्हता.
मँचेस्टर युनायटेडसोबतच्या खराब सत्रानंतर रोनाल्डो रिफ्रेश होण्यासाठी काही दिवसांसाठी देशाबाहेर सुट्टीवर गेला आहे. तो त्याच्या पूर्ण कुटुंबीयांसह मजोरका बेटावर आहे. तेथे त्याच्या कारला अपघात झाला.
रोनाल्डोचा अंगरक्षक ही कार चालवत होता आणि तो एकटाच होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार ढिगावर जोरदार आदळली आणि त्यात कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. तेथे उपस्थित एका व्यक्तीने सांगितले की, ही कार ढिगावर जाऊन आदळळी; परंतु चालकाला दुखापत झाली नाही.