पुणे : अवघे शहर रंगले योगाभ्यासात | पुढारी

पुणे : अवघे शहर रंगले योगाभ्यासात

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये योगाची विविध आसने करून हा दिवस साजरा केला. सेंट मीरा महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. सुवर्णा देवळाणकर यांनी दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर महाविद्यालयीन खेळाडू सई कचरे, काजल यादव, अनुष्का सरडे, संध्या शेंडगे, सरिता पालीवाल, प्राची शर्मा यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रभारी प्राचार्य डॉ. जया राजगोपालन यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ. शालिनी अय्यर यांच्या सहकार्याने आयोजित केला गेला. या वेळी जिजामाता पुरस्कार विजेत्या गुरबन्स कौर, रजिस्ट्रार गौरी म्हाळगी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन एकता जाधव यांनी केले.

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी! उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून पहिलेच बंड, आता नेतृत्वाची खरी कसोटी!

आयडियल कॉलनीमध्ये ज्येष्ठ महिला कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांच्या उपस्थितीत योगासने सादर करण्यात आली. आयडियल सोसायटी, योग आनंद व कलाभारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, योग आनंदचे प्रशिक्षक विनय गांधी, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गांधी, शैलेश बुरसे, सोमदत्त पटवर्धन, मकरंद केतकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये योग दिन साजरा करण्यात आला. ब—ह्माकुमारी रोहिणी दीदींनी राजयोगाचे महत्त्व आणि राजयोगाचे प्रात्यक्षिक करून घेतले. या वेळी पोलिकेचे सहआयुक्त आशिष महाडदळकर, गणेश सोनुने व कर्मचारी उपस्थित होते.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘ताल आरोग्यम योगथॉन 2022’चे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन तास सुमारे 300 कर्मचारी व 3000 विद्यार्थी व असोसिएट्स यांनी संकुलामध्ये, तसेच ऑनलाईन तबल्याच्या, संगीताच्या तालावर योग केला. या वेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांनी देखील सर्वांसोबत पूर्णवेळ योग प्रात्यक्षिके केली. या वेळी प्राणायाम, वॉर्मअप, सूर्यनमस्कार, योगासने असे विविध व्यायामप्रकार करत ‘तालआरोग्यम्’ साधण्यात आले.

नेवासा : विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये योग दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. (डॉ.) संजीव सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. विजय खरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. (डॉ.) दीपक माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, सहायक क्रीडा संचालक डॉ. दत्ता महादम, जनसंपर्क विभागाचे सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे आदी उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध घटक संस्थांमध्ये जागतिक योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रानडे बालक मंदिरात योगशिक्षिका शिल्पा पराडकर यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, उत्कटासन, भुजंगासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन ही आसने करून घेतली. भारती अभिमत विद्यापीठाच्या पौड रस्ता कँपसमध्ये आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक सुषमा येंगे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके झाली. ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते योग मार्गदर्शक सुषमा येंगे यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे विमानतळ प्रशासनाकडूनही उपक्रम
पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात 100 कर्मचारी सहभागी झाले होते. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापकीय संचालक गगन मलिक, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. संदीप बुटाला, पतंजली योग संस्थेचे अंकुश नवले उपस्थित होते.

Back to top button