माउलींचे हिरा-मोती अश्व आळंदीत दाखल; देवस्थानच्या वतीने परंपरागत स्वागत | पुढारी

माउलींचे हिरा-मोती अश्व आळंदीत दाखल; देवस्थानच्या वतीने परंपरागत स्वागत

आळंदी : पुढारी वृत्तसेवा: माउलींच्या पालखी सोहळ्यातील प्रथापरंपरांचे पालन करीत श्रींचे मानाचे हिरा व मोती अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले. देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यातील परंपरेप्रमाणे अश्वांचे आळंदीत स्वागत करण्यात आले अश्वांचे अंकली (ता. चिकोडी, बेळगावी, कर्नाटक) येथील राजवाड्यातून वाहनाने प्रवास करत श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात विसावले. येथे हरप्रीतसिंग बिडकर सरदार, उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांच्यातर्फे पूजा स्वागत करण्यात आले.

आळंदीतील बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्यादरम्यान माउलींच्या मंदिरात अश्व आळंदीसमीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत व पूजा केली. यावेळी अश्व सेवेचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरदार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आदी उपस्थित होते.

आळंदीत टाळ-मृदुंग व हरिनाम गजरात अश्व मंदिरात आले. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींच्या अश्वांचे स्वागत केले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानच्या वतीने अश्वपूजा झाली. मानकर्‍यांना नारळ-प्रसाद देण्यात आला.

हेही वाचा

पत्नीला मारणार्‍या नवर्‍यावर गुन्हा

पंढरपुरात आषाढी यात्रेच्या तयारीची लगबग

माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥

Back to top button