पिंपरी : कामगार नगरीमध्ये मजूर अड्ड्याची वानवा | पुढारी

पिंपरी : कामगार नगरीमध्ये मजूर अड्ड्याची वानवा

पिंपरी : शहराची कामगारनगरी अशी ओळख असूनदेखील मजूर अड्ड्यांची संख्या कमी असल्यामुळे शहरात ठेकेदारांना कामगारांची शोधाशोध करावी लागत असल्याचे दिसत आहे.

कामगार नगरीमध्ये कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात मजूर अड्डा नसल्याने पैसे कमावण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्यांना काम मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये फिरावे लागत आहे. तर, कंपनीच्या गेटवरून ठेकेदारांचा नंबर घेऊन ठेकेदारांना शोधावे लागत आहे. शहरात एकही अधिकृत मजूर अड्डा नसून सध्या 5 ते 7 मजूर अड्ड्यांची गरज आहे.

मजूर अड्ड्याचे महत्त्व

– ठेकेदारांना मजूर एकाच जागी मिळू शकतात.
– बाहेर गावाहून आलेल्यांना काम मिळवण्यासाठी फिरावे लागत नाही.
– एकाच जागी विविध काम मिळतात.
– अड्ड्यावर मिळणार्‍या सुविधा
– झुणका भाकरी केंद्र
– आरोग्य सुविधा
– संपर्क करण्यास सोईस्कर

अनेक ठिकाणी मजूर अड्ड्यावर मजुरांची नोंद घेतली जाते. नोंद ठेवल्याने ठेकेदारांना संपर्क करणे सोईचे जाते. कामगारांची गरज भासल्यास ठेकेदार मजुरांना संपर्क करतात.

सध्या अनेक ठिकाणी मजुरांची वानवा आहे. त्यामुळे ज्यांना काम हवे आहे ते कंपन्यांच्या गेटवरून आमचे नंबर मिळवतात
– संतोष कासार, ठेकेदार

कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर हवे असून वस्त्यांमधून फिरावे लागते. तेव्हा कुठे आम्हाला मजूर मिळतात.
– मोहन दांगडे, ठेकेदार

Back to top button