पिंपरी : स्मार्ट सिटीतर्फे ‘सबका भारत, निखरता भारत’; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन | पुढारी

पिंपरी : स्मार्ट सिटीतर्फे ‘सबका भारत, निखरता भारत’; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी : स्मार्ट सिटीतील हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्यावतीने शनिवार (दि. 25) ते सोमवार (दि. 27) असे तीन दिवस शहरात राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमात विद्यार्थी, नागरिक व संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे. कार्यक्रम आयोजनाबाबत आयुक्तांच्या दालनात अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीस स्मार्ट सिटीचे उपमुख्य अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवारउपस्थित होते.

निगडी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करणे, स्मार्ट सिटी प्रकल्प पाहणी दौरा आयोजित करणे, स्मार्ट सिटी कामाचे चित्रांकन, हवामान जागरूकता मोहीम, लोकांची मते, सार्वजनिक जागा सुधारणे, तरुण उद्योजकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित ‘आयडिया थॉन’, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, रेडिओ शो, स्टार्ट अपमध्ये नवीन उपक्रम मेळावे, हरित शहर, नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांजवळ देशी वृक्ष लावण्यासाठी जागृत करणे, शहरी शेतीवरील कार्यशाळा, थंड व ऊर्जा कार्यक्षम इमारत बांधकाम पद्धती आदींचे आयोजन केले जाणार आहे.

शहरातील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, एबीडी एरिया, 8 टू 80 पार्क, सीसीटीव्ही कॅमेरे, पालिका शाळेतील ई- क्लासरुम, पदपथ, स्टार्टअप अशा नव तंत्रज्ञान व कौशल्यपूर्ण प्रकल्पांची माहितीन नागरिकांना दिली जाणार आहे.

Back to top button